पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

षटकारानं घायाळ झालेल्या 'त्या' तरुणीला 'हिटमॅन' रोहितची खास भेट

हिटमॅन रोहित शर्मा

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये भारताच्या विजयाबरोबरच अनेक गोष्टींनी लक्ष वेधून घेतलं. मंगळवारी रंगलेल्या या सामन्यात हिटमॅन रोहितची बांगलादेश विरुद्धची खेळी क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. मात्र यावेळी रोहितनं मारलेल्या षट्कारानं सामना पाहायला आलेल्या मिना नावाच्या भारतीय फॅनला बॉल लागला.

सामना संपल्यानंतर रोहितनं या फॅनची भेट घेतली आणि तिची आपुलकीनं चौकशी केली. इतकंच नाही तर रोहितनं तिला स्वत:ची स्वाक्षरी असलेली एक कॅपही भेट दिली. हा 'फॅन मुव्हमेंट' कॅमेरात कैद झाला आहे. 

तर दुसरीकडे रोहितने कारकिर्दीतील २६ वे शतक झळकावल्यानंतर ८६ वर्षांच्या चारुलता पटेल या आजीबाईंनी आपला आनंद साजरा केला. भारतीय संघासह रोहित शर्माला प्रोत्साहन देणाऱ्या आजीबाईंचा जोश पाहण्याजोगा होता. सामना संपल्यानंतरही सोशल मीडियावर या आजीबाईंची चांगलीच चर्चा रंगली.

भारतानं बांगलादेशविरोधातला सामना जिंकल्यानंतर रोहित आणि कर्णधार विराट कोहली या दोघांनी आजींचे  आशीर्वाद घेतले. विराटनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आजींचा फोटो शेअर करत त्यांचे आभारही मानले.