पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टार्क टॉपर! रोहितला 'ओव्हर टेक' करण्याची रुट-विल्मम्सनकडे फायनल संधी

रोहित शर्मा आणि मिचेल स्टार्क

विश्वचषक स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारताचा मँचेस्टरच्या मैदानात तर पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा बर्मिंगहॅमच्या मैदानात स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी फायनलमध्ये धडक मारली असून हे दोन्ही  संघ पहिल्यांदा विश्वचषक पटकावण्यासाठी मैदानात उतरतील. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे आव्हान सेमीफायनलमध्येच संपुष्टात आले असले तरी यंदाच्या स्पर्धेतील फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सर्वात्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोन संघांतील फलंदाजांनी आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संध्या अव्वलस्थानी आहे. त्याने ९ डावात ५ शतकांच्या मदतीने ८१ च्या सरासरीनं ६४८ धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सचिनं तेंडुलकरच्या ६७३ धावांच्या विक्रमापासून रोहित शर्मा अवघ्या २५ धावांनी दूर राहिला. तेंडुलकरने २००३ च्या विश्वचषकात विक्रमी धावसंख्या उभारली होती.

तिकीटेच नसल्यामुळे टीम इंडियाचा परतीचा प्रवास लांबला...

त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावे ६४७ धावा आहेत. यांच्याव्यतिरिक्त बांगलादेशचा शाकिब अल हसन (६०६), इंग्लंडचा जो रुट (५४९) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन (५४८) यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. इंग्लंड आणि न्यझीलंड फायनलमध्ये खेळणार आहेत जो रुट आणि विल्यम्सन यांनी रोहित आणि वॉर्नर यांना मागे टाकण्यासाठी शतकी खेळी करावी लागेल. फायनलमध्ये या दोघांना हे जमले नाही तर रोहित अव्वलस्थान कायम राहिल.

गोलंदाजीच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क इतर गोलंदाजाच्या तुलनेत फारच पुढे आहे. यंदांच्या विश्वचषकात स्टार्कने १० सामन्यात ५०२ धावा खर्च करत २७ बळी टिपले आहेत. यात त्याने दोनवेळा चार बळी तर २ वेळा पाचबळी बाद करण्याचा पराक्रम करुन दाखवला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी या सामन्यात स्टार्कने आतापर्यंतच्या विश्वचषकातील विक्रमी कामगिरी नोंदवली. त्याने जॉनी बेअरस्टोला बाद करत विश्वचषकातील २७ वा बळी मिळवत ग्रेन मेग्राच्या एका विश्वचषक स्पर्धेतील २६ बळी मिळवण्याचा विक्रम मागे टाकला.

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया

मॅग्राने २००७ च्या विश्वचषकात २६ गडी बाद केले होते. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्कशिवाय बांगलादेशचा मुस्ताफिझूर ८ सामन्यात २०, इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चर १० सामन्यात १९,  जसप्रीत बुमराह ९ सामन्यात १८ तर न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने ८ सामन्यात १८ बळी टीपले आहेत.