पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर टी-२० चे नेतृत्व रोहितकडे द्यावे : युवराज सिंग

रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवरील भार कमी करण्यासाठी टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर द्यावी, असे मत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने व्यक्त केले. 'आजतक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी युवराजने आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. 

PKL : दिल्ली समोर पाटणा हारले, पण..चर्चा फक्त नारवालचीच!

युवराज म्हणाला की, पूर्वी क्रिकेटमध्ये एकदिसीय आणि कसोटी हे दोनच प्रकार होते. त्यावेळी दोन्ही संघाचे नेतृत्व एकाकडे असणे ठिक होते. पण सध्याच्या घडीला टी-२० प्रकाराची यात भर पडली आहे. जर विराट कोहलीला अधिक ताण पडत असेल, तर भारताच्या टी-२० संघाची जबाबदारी ही रोहित शर्माकडे देण्यास काहीच हरकत नाही. टी-२० प्रकारातील तो एक यशस्वी कर्णधार असल्याचा उल्लेखही युवीने यावेळी केला.   

यष्टिमागची दूरदृष्टी 'फेल', तरीही शास्त्री म्हणतात पंत 'स्पेशल'

तो पुढे म्हणाला,  विराट कोहली सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे त्याचा वर्कलोड कसा कमी करायचा हा निर्णय सर्वस्वी संघ व्यवस्थापनाकडे असेल. विश्वचषका दरम्यान चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांनी निराश केल्याचे पाहायला मिळाले होते. यावरही त्याने भाष्य केले. विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या फंलदाजाचा सर्वोत्तम धावसंख्याही ४८ धावा ही होती. कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीने या समस्येकडे दुर्लक्ष केले, असे मतही युवीने रोखठोकपणे मांडले.