पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात लढा : रोहित शर्माकडून महाराष्ट्रासाठी २५ लाखांची मदत

रोहित शर्मा

कोरोनाविरोधातील लढाईसाठी भारतीय संघातील खेळाडू महाराष्ट्रासाठी उभे राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत अनेक क्रिकेटर्सनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. क्रिकेटर रोहित शर्मादेखील पुढे  आला आहे. त्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत देऊ केली आहे तर पीएम केअर फंडसाठी ४५ लाखांची मदत दिली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू

युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रोहित शर्माचे आभार मानले आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्राला 'विरुष्का'ची मदत

क्रिकेट विश्वातून आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महिंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांसारख्या क्रिकेटर्सनं मदत केली आहे. विराट कोहलीनं आपला मदत निधी जाहीर केला नाही. अजिंक्य रहाणेनं १० लाखांची तर सचिन तेंडुलकरनं ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.