पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN : रोहितला खुणावतोय आणखी एक विक्रम, पण...

रोहित शर्मा

India vs Bangladesh, 2nd Test at Rajkot: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असेल. याशिवाय या सामन्यात कार्यवाहू कर्णधार रोहित शर्माला आणखी एक विक्रम खुणावत आहे. 

INDvsBAN: रोहितनं धोनी-कोहलीचा विक्रम टाकला मागे

पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरुनही रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांचे वेगवेगळे विक्रम मागे टाकले होते. दुसऱ्या सामन्यात त्याला आणखी काही विक्रम करण्याची संधी आहे. राजकोटच्या मैदानात रोहित शर्माने ७२ धावांची खेळी केली तर सुरेश रैनाचा विक्रम मागे टाकण्याचा पराक्रम त्याच्या नावे नोंद होईल. भारताकडून टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे आहे.   

-विराट कोहली २५७ सामन्यात ८ हजार ५५६ धावा 
-सुरेश रैना ३०३ सामन्यात ८ हजार ३९२ धावा
-रोहित शर्मा ३०६ सामन्यात ८ हजार ३२१ धावा
-शिखर धवन २४७ सामन्यात ७ हजार ७३ धावा
-महेंद्रसिंह धोनी २८३ सामन्यात ६ हजार ६२१ धावा
 

IND vs BAN: दुसऱ्या सामन्यावर वादळी संकट

उल्लेखनिय आहे की, राजकोटमध्ये होणाऱ्या सामन्यावर महा वादळाचे संकट घोंगावत आहे. गुजरातच्या किनारपट्यांवरील वादळी फटक्यामुळे याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर रोहितला या विक्रमासाठी प्रतिक्षा करावी लागेलच शिवाय बांगलादेशला मालिका गमावण्याची भिती राहणार नाही.