पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिच्या 'ग्रेट' भाषणावर रोहित म्हणाला, ग्रेटा तू आमची 'प्रेरणा' आहेस

रोहित शर्मा आणि ग्रेटा थनबर्ग

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जल पर्यावरण परिषदेत १६ वर्षांच्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने दिलेल्या भाषणाने भारताचा सलामीवीर रोहित शर्मा प्रभावित झाला आहे. ग्रेटा थनबर्गचे भाषण प्रेरणादायी असल्याचा उल्लेख करत रोहितने या तरुणीचे कौतुक केले आहे. यासंदर्भात त्याने ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली. 

स्वीडनच्या ग्रेटाने पर्यावरण परिषदेत सहभागी झालेल्या वैश्विक नेत्यांना चेतावणी देणारे भाषण करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. जलवायू प्रदुषणाबाबत ती म्हणाली की, मला यावेळी शाळेत असायला हवे होते. पण परिस्थितीचे गांभिर्यामुळे मला या व्यासपीठावर यावे लागले.  

तुमची हिंमत कशी झाली? १६ वर्षांच्या कार्यकर्तीचा नेत्यांना सवाल

ग्रेटाच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने ट्विटच्या माध्यमातून तिचे कौतुक केले. याशिवाय पृथ्वीवरील प्रदुषणाची जबाबदारी लहान मुलांवर सोडणे चुकीचे आहे, असे मतही त्याने व्यक्त केले. ग्रेटा तू आमच्यासाठी प्रेरणादायी आहेस. आता कारणे न देता आपल्याला येणाऱ्या पिढीच्या सुरक्षेसाठी पावले उचलायला हवीत, असा उल्लेखही रोहितने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rohit sharma appreciate swedish climate activist greta thunberg tweets youre an inspirat