पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI, 1st T20: रोहित शर्मा मोडणार गेलचा रेकॉर्ड ?

रोहित शर्मा

India Tour of West Indies 2019, 1st T-20, INDvsWI: टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या विक्रमानजीक आहे. रोहितने ९४ टी-२० सामन्यात १०२ षटकार ठोकले आहेत. तर गेलने याच प्रकारात सर्वाधिक १०५ षटकार लगावले आहेत.

भारताचा शनिवारी फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिअममध्ये वेस्ट इंडिजबरोबर तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा हा विक्रम आपल्या नावे करण्याची शक्यता आहे.

Ashes 2019: पहिल्याच दिवशी पंचांनी दिले ७ चुकीचे निर्णय

ख्रिस गेलने ५८ सामन्यांत १०५ षटकार लगावले आहेत. त्यानंतर न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलचे नाव आहे. त्याच्या नावे ७६ सामन्यात १०३ षटकार आहेत. ख्रिस गेल भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. त्याला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. त्याची ही अखेरची वनडे मालिका असेल. 

रोहित शर्माच्या नावावर टी-२० सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंद आहे. रोहितने ३२.३७च्या सरासरीने २३३१ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी २ हजार अर्ज

मालिकेत या विक्रमासाठी विराट-रोहितमध्ये स्पर्धा

कर्णधार विराट कोहलीने उपकर्णधार रोहित शर्माबरोबर मतभेद नसल्याचे जाहीर केले असले तरी या दोन्ही खेळाडूंमध्ये या टी-२० मालिकेत पुढे जाण्याची स्पर्धा रंगणार आहे. रोहित सध्या टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर विराट याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

रोहित शर्माने ९४ सामन्यांमध्ये २३३१ धावा केल्या आहेत. विराटने ६७ सामन्यांत २२६३ धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने या प्रकारात एकही शतक केलेले नाही. त्याच्या खात्यात २० अर्धशतकांचा समावेश आहे. विराट आणि रोहितमध्ये ६८ धावांचे अंतर आहे.

मी फक्त संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो : रोहित शर्मा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rohit Sharma 4 sixes Away From Beating Awesome Chris Gayle Record india vs west indies 1st t20