पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA हिटमॅन रोहितच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद

केशव महाराजने दोन्ही डावात रोहित शर्माची शिकार केली.

India vs South Africa, 1st Test Day- 4: भारतीय संघाचा टी-२० आणि एकदिवसीय सामन्यातील सलामीवीर रोहित शर्माने कसोटीमध्येही आपली ओळख हिटमॅनच असल्याचे सिद्ध केले. त्याने दोन्ही डावात शतकी कामगिरी करुन स्वत:ला कसोटी सलामीवीर म्हणून सिद्ध केले. सलग दोन शतकाच्या जोरावर त्याच्या नावे विक्रमाचीही नोंद झाली. मात्र या सामन्यात  नको असा लाजिरवाणा विक्रमही त्याच्या खात्यात पडला. 

'विराट' रुप पाहून स्टोक्सनं हिटमॅन रोहितला केलं ट्रोल

रोहित शर्मा एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात यष्टिचित होणारा पहिला भारतीय ठरला. रोहितपूर्वी एकही भारतीय फलंदाज दोन्ही डावात यष्टिचित झालेला नाही. पहिल्या डावात रोहित शर्माने २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. यात २३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. द्विशतकी खेळीकडे वाटचाल करत असताना आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजाने त्याला चकवा दिला आणि यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने कोणतीही चूक न करता त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, भावनिक पोस्टसह शेअर केली माहिती

दुसऱ्या डावातही दुसऱ्या डावातही केशव महाराजनेच रोहितला बाद केले. यावेळीही क्विंटन डी कॉकने यष्टिमागे चोख भूमिका निभावली. दुसऱ्या डावात रोहितने १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे यापूर्वी रोहित शर्मा एकदाही यष्टिचित झालेला नव्हता.