पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितच्या फटकेबाजीनं अख्तरला आठवली सचिनने दिलेली वेदनादायी जखम

शोएब अख्तर आणि रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरीचा सपाटा कायम ठेवत रोहित शर्माने निर्णायक सामन्यात शतकी खेळीनं भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यातील रोहितच्या खेळीचं माजी पाक गोलंदाज शोएब अख्तरनं कौतुक केलं आहे. 'उसने मार मार के भरता बना दिया' अशा शब्दांत त्याने रोहितच्या फटकेबाजीला दाद दिली आहे. अख्तरने आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे समीक्षण केलयं. निर्णायक सामन्यातील रोहितच्या अप्पर कटने सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्वचषकात मारलेल्या षटकाराची आठवण करुन दिली, असेही अख्तरने म्हटले आहे.  

स्मिथ भारी खेळला, पण 'विराट' स्मित हास्य लाभलं कोहलीलाच!

बंगळुरुच्या मैदानात २८७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. शिखर धवन जायबंदी झाल्यामुळे लोकेश राहुलच्या साथीने रोहित शर्माने  भारताच्या डावाला सुरुवात केली. लोकेश राहुल अवघ्या १९ धावा करुन माघारी फिरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया भक्कम केला. त्याने या सामन्यात ११९ धावांची खेळी केली. विराट कोहलीने या सामन्यात ८९ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान ४७.३ षटकात पार केले. 

INDvsAUS: कांगारुंचा वचपा काढला, बंगळुरुमध्ये रोहित-विराट हिट शो!

रोहित जेव्हा लयीत असतो तेव्हा तो चांगला चेंडू आणि खराब चेंडू याची चिंता करत नाही. त्याच्या भात्यातून निघणाऱ्या  स्वाभाविक फटकेबाजीला रोखणे मुश्किल असते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कला लगावलेला अप्पर कट पाहून सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्वचषकात माझ्या गोलंदाजीवर लगावलेल्या अप्पर कटची आठवण झाली, असेही अख्तरने म्हटले आहे. 
रोहित आणि सचिनच्या अप्पर कटशी तुलना होण्याची ही पहिली वेळ नाही. मागील वर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकात रोहित शर्माने पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीच्या षटकात आपल्या भात्यात सचिनसारखा अप्पर कट असल्याचे दाखवून दिले होते.

INDvsAUS : कोहलीची आणखी एका 'विराट' विक्रमाला गवसणी

बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर भारताच्या डावातील चौथ्या षटकातील स्टार्कच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माने सिक्सर लगावल्याचे पाहायला मिळाले होते. आयसीसीने देखील सचिन आणि रोहित यांच्या अप्पर कटचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटरवरुन शेअर करत कोणता फटका अप्रतिम आहे, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना विचारला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rohit ne maar k bharta bana dia shoaib akhtar recalls tendulkar assault after india beat australia in 3rd odi