पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेडररची प्रतिमा आणखी उजळली, सन्मानार्थ स्विसच्या नाण्यावर कोरले चित्र

फेडररचा अनोखा सन्मान

जगभरातील टेनिस चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या स्वित्झर्लंडचा स्टारला स्विसने एका अनोख्या पद्धतीने सन्मानित केलय. स्वित्झर्लंडच्या टाकसाळ स्विसमिंटने फेडररच्या सन्मानार्थ त्याच्या प्रतिमेसह २० फ्रँकचा चांदीचा शिक्का तयार केला आहे. स्विसमिंटने जिवित व्यक्तिच्या सन्मानार्थ चांदीचा शिक्का जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

Video : अप्रतिम त्रिफळा उडवला, पण वहाबचाच 'बकरा' झाला

स्विसमिंटने एका पत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. रॉजर फेडररच्या प्रतिमेसह आम्ही शिक्का तयार केला आहे. इतिहासात पहिल्यांदा जिवित व्यक्तीच्या नावाने शिक्का तयार करण्यात आल्याचा उल्लेखही या पत्रकामध्ये करण्यात आला आहे. फेडरर बॅकहँण्डचा फटका खेळतानाच्या छबीसह ५५ हजार शिक्के तयार करण्यात आले आहेत. 

रणजी ट्रॉफी : मुंबई संघाची घोषणा, पृथ्वीसह अजिंक्यच्या नावाचाही समावेश

स्विसमिंट २० फ्रँक शिक्के मे महिन्यामध्ये जारी करण्यात येणार आहेत. या मोठ्या सन्मानाबद्दल फेडररने स्विसमिंटचे आभार मानले आहेत. ३८ वर्षीय फेडरर स्वित्झर्लंडचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली आहे. सध्याच्या घडीला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररने एटीपी रँकिंगमध्ये ३१० आठवडे अव्वलस्थानी राहण्याचा विक्रमही त्याचे नावे आहे.