पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेडररचा विक्रम, दहाव्यांदा पटकावले स्वीस ओपनचे जेतेपद

रॉजर फेडरर

स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडररने विक्रमी दहाव्यांदा स्वीस ओपन इनडोअर  चॅम्पियनशीप किताब आपल्या नावे केला. फेडररने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स मिनाऊरला पराभूत करत आपल्या कारकीर्दीत १०३ वेळा एकेरीचा किताब पटकावला. फेडररने अलेक्सवर ६-२,६-२ असा विजय मिळवला.

दिवाकर रावतेंच्या पाच मिनिटांच्या राज्यपाल भेटीने चर्चेला उधाण

३८ वर्षीय फेडरर आपल्या गृहस्थळी खेळताना आक्रमक दिसला. त्याने २० वर्षीय अलेक्सवर एकतर्फी विजय नोंदवला. अलेक्स यावर्षीचे आपले चौथे किताब पटकावण्याच्या प्रयत्नात होता. एटीपी टूर वेबसाईटने फेडररच्या हवाल्याने वृत्त देताना म्हटले की, हा सामना खूप चांगला होता. मला वाटते मी शानदार खेळ केला, असे फेडररने म्हटले.

 स्वीस मास्टरमध्ये अलेक्सच्या खेळाचे कौतुक झाले. फेडरर म्हणाला की, अलेक्सने संपूर्ण मालिकेत जबरदस्त खेळ केला. मला वाटते आम्ही दोघे या निकालावर खूश आहोत. माझ्यासाठी हा विजय खूप खास आहे. कारण हे माझ्या घरचे म्हणजे, बासेलमधील माझा दहावा किताब आहे.

... अशा पद्धतीने शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले

या विजया बरोबर फेडररला ५०० एटीपी रँकिंग गुण मिळतील आणि त्याचबरोबर ४३०,१२५ डॉलर पुरस्काराची रक्कमही मिळेल.