पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेडररचं ऑलिम्पिंकमध्ये खेळण्याबाबत ठरलं!

रॉजर फेडरर

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस स्टार रॉजर फेडरर पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्ध फेडररने याबाबत स्पष्टीकरण दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावे असे मनापासून वाटल्याने मी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला, असे फेडररने म्हटले आहे.

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय

२० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवणारा फेडरर म्हणाला की, विम्बल्डननंतर आणि अमेरिकन ओपनपूर्वी काय करावे यासंदर्भात टीमममधील सहकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे ठरवले अथेन्स आणि बिजिंग ऑलिम्पिकमध्ये मला स्वित्झर्लंडचा ध्वजवाहकाचा मान मिळाला होता. यावेळी सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवण्यात यश मिळाल्याची आठवणही त्याने सांगितली. तसेच या स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचेही तो म्हणाला.  

विराट कोहलीनं व्यक्त केली किल्ले रायगडावर जाण्याची इच्छा

गँडस्लॅममध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या फेडररला ऑलिम्पिकमध्ये एकेरीत आतापर्यंत सुवर्ण कामगिरी करता आलेली नाही. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फेडररने एकेरीत रौप्य पदक पटकावले होते. अंतिम सामन्यात त्याला ब्रिटनच्या एंडी मरेने पराभूत केले होते. दुखापतीमुळे गत वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकला मुकला होता. कारकिर्दीतील पाचव्या ऑलिम्पिकमध्ये तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.