पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेडररला लागलंय बॉलिवूडचं याड, नेटकऱ्याने सुचवले हे चित्रपट

रॉजर फेडरर

तब्बल २० वेळा ग्रँडस्लम विजेतेपद पटकवणाऱ्या स्वित्झर्लंडच्या टेनिस स्टार रॉजर फेडररचे भारतात अनेक चाहते आहेत. आपल्या याच चाहत्यांना फेडररने ट्विटरच्या माध्यमातून भारतातील हिंदी चित्रपटाबाबत सल्ला विचारला आहे. बॉलिवूड चित्रपटासंदर्भात फेडररचे कोडे सोडवण्यासाठी अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.  

INDvSA Day2- आफ्रिकेची आघाडी भारतीय फिरकीसमोर गडबडली

फेडररच्या ट्विटरवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधील एका चाहत्याच्या सुचना फेडररला पटली असून या चाहत्याने दिलेल्या सल्ल्याबद्दल फेडररने त्याचे आभार मानले आहेत. या चाहत्याने फेडररला चार हिंदी चित्रपटांची नावे सुचवली आहेत. टेनिस स्पर्धेपासून विश्रांती घेत असलेल्या फेडररने ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडचा कोणाता चित्रपट पाहावा? असा सल्ला चाहत्यांना विचारला होता.

रोहितनं मागे टाकला सर डॉन ब्रॅडम यांचा विक्रम

यावर प्रतिक्रिया देत अनेकजणांनी त्याला चित्रपटांची नावे सुचवल्याचे पाहायला मिळाले. एका नेटिझन्सने 'शोले', 'लगान', 'दंगल' आणि 'जोधा अकबर' या चार चित्रपटांची नावे सुचवली होती. या ट्विटवर फेडररने धन्यवाद! अशी प्रतिक्रिया दिली आहे.