पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सचिनचा निर्णय विरुला खटकला!

सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेच्या लिजेंड्सला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होते. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत निर्धारित २० षटकात श्रीलंकेला १३८ धावांत रोखले. अन् भारताने हे लक्ष पार करत सामनाही जिकंला. पण विराटला मात्र सचिनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खटलकला. सामन्यानंतर सेहवागने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. 

कोरोना : IPL स्पर्धेला स्थगिती द्या, कोर्टात याचिका दाखल

सचिन तेंडुलकरने श्रीलंका लिजेंड्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय चुकीचा होता, असे म्हटले आहे. सामन्यानंतर सेहवाग म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर सचिनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे आम्हाला २० षटके क्षेत्ररक्षण करावे लागले. त्यामुळे फलंदाजीपूर्वी आम्ही थकलो होतो, असे सेहवागने म्हटले आहे.  

INDvsSA : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी 'प्रोटोकॉल'

डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकन लिजेंड्सनी दिलेल्या १३८ धावांचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवाग अवघ्या ३ धावांवर धावबाद झाला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराला चमिंडा वासने खातेही उघडू दिले नव्हते. त्यानंतर मोहम्मद कैफने ४५ चेंडूत केलेल्या ४६ धावा आणि इरफान पठाणने ३१ चेंडूत केलेल्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर इडिया लिजेंड्स संघाने १८. ४ षटकातच श्रीलंकन लिजेंड्सचे आव्हान परतवून लावले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:road safety world series Virender Sehwag hilarious reaction after Sachin Tendulkar opts to field