पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतला सुधारण्यासाठी बीसीसीआय काही करायला तयार

ऋषभ पंत

आगामी वर्षातील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टीकेचा धनी ठरत असलेल्या ऋषभ पंतवर बीसीसीआयच्या निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. यष्टिमागे ऋषभ पंत चुका करत असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मान्य केले असून त्याच्या कामगिरीतील सुधारणेसाठी खाश तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 

पुढच्या दोन मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीविषयीचा संभ्रम कायम

यापूर्वी यष्टिमागील चुका सुधारण्यासाठी ऋषभ पंतने माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांचे मार्गदर्शन घेतले होते. विंडीजविरुद्दच्या सामन्यात यष्टिमागे झेल सोडल्याने पंत पुन्हा ट्रोल झाला. त्याच्या यष्टिमागील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पंतच्या कामगिरीवर बोलताना प्रसाद म्हणाले की, त्याने यष्टिमागील कामगिरीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्ही त्याला यासाठी आवश्यक ती मदत करायला तयार आहोत. याचेच एक पाऊल म्हणून विशेष यष्टिरक्षक प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार करत आहोत. याचा अर्थ फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकानंतर आता भारतीय संघासोबत विशेष यष्टिरक्षक प्रशिक्षक पाहायला मिळणार असल्याचे संकेत एमएसके प्रसाद यांनी दिले आहेत.

VIDEO: सेरेनाशी पंगा घेण्याचे माझ्यात धाडस नाही : माइक टायसन

यष्टिरक्षक प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार आणि ही निवड प्रक्रिया कधीपर्यंत होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.  
२२ वर्षीय ऋषभ पंतकडे माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. त्याला संघ व्यवस्थापनला त्याच्यावर विश्वास असून अधिकाधिक संधी देण्यात येत आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी देखील यापूर्वी पंतची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले होते. परिपक्व होण्यासाठी त्याला अधिकाधिक संधी मिळायला हवी, अशी भूमिका रोहित आणि विराटने घेतली होती. निवड समितीदेखील पंतच्याबाबतीत सकारात्मक आहे. त्याचा पंत कितपत फायदा घेणार? हे येणारा काळच ठरवेल.