पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऋषभ पंतला अफगाणिस्तान विरुद्ध संधी मिळणार?

ऋषभ पंत

विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतग्रस्त झाला आहे. जलदगती गोलंदाज बुमराहच्या यॉर्करने त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर खेळणार की नाही यासंदर्भात संभ्रम आहे. त्यामुळे धवनच्या दुखापतीनंतर संघात स्थान मिळालेला ऋषभ पंत विजय शंकरच्या दुखापतीनंतर मैदानातही उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बुमराहच्या यॉर्करवर विजय शंकर घायाळ, भारताला आणखी एक धक्का

विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर कर्णधार विराट कोहलीने दिनेश कार्तिक दबावात चांगला खेळ करु शकतो, त्यामुळे त्याला संधी देण्यात आल्याचे म्हटले होते. अफगाणिस्तान भारतीय संघाविरुद्ध मोठे आव्हान नाही, त्यामुळे भारतीय संघ विजय शंकरला खेळवण्याऐवजी त्याला पूर्णपणे विश्रांती देण्यावरच भर देईल. 

पंत माझ्यापेक्षाही भारी, युवीनं केली होती भविष्यवाणी

यापरिस्थितीत विजय शंकरच्या जागी पंतसोबतच दिनेश कार्तिकच्या नावाचाही विचार होऊ शकतो. दिनेश कार्तिक सुरुवातीपासून संघासोबत असला तरी त्याला टीम इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. अफगाणिस्तान विरुद्ध कर्णधार विराट कोहली कोणावर विश्वास दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.