पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ऋषभ पंत नव्या पिढीतील सेहवाग'

ऋषभ पंत

भारताचे माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय माजरेकर यांनी ऋषभ पंतच्या खेळीची तुलना भारताचा माजी सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज विरेंद्र सेहवागशी केली आहे. ऋषभ पंत हा नव्या पिढीतील सेहवाग आहे, असे मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले. पंतकडे आपण एका वेगळ्या नजरेनं पाहायला हवे जेणेकरून तो त्याची नैसर्गिक खेळ दाखवू शकेल, असेही ते म्हणाले आहेत.   

मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलंय की, 'ऋषभ पंत नव्या पिढीतील विरेंद्र सेहवाग आहे. त्याच्या फलंदाजीकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. त्याला जसे खेळायचे आहे तसे खेळण्याची मोकळीक द्यायला हवी. तुम्ही त्याला संघात स्थान द्या किंवा देऊ नका तो आपली खेळण्याची शैली बदलणार नाही.' 

IPL 2019: फायनलपूर्वी रोहित शर्माचे देव दर्शन

ऋषभ पंतने बुधवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने अवघ्या २१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली होती. एलिमिनेटरच्या सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकविला होता. महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून लक्ष वेधणाऱ्या पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये १५ सामन्यात ४५० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो लयीत दिसत असला तरी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. निवड समितीने त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संधी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.