पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : पहिलं अर्धशतक पंतसाठी दिलासा देणार ठरेल

ऋषभ पंत

चेन्नईच्या मैदानात विंडीज विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मध्यफळीतील फलंदाजांनी विश्वासक कामगिरी केली. मात्र कॅरेबियन ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजांच्या दिमाखदार खेळामुळे टीम इंडिया सलामीच्या सामन्यात परभवाला सामोरे जावे लागले. विंडीजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

INDvsWI, 1st ODI : हेटमायर-होप जोडीनं विराट सेनेचं आव्हान सहज परतवलं

या सामन्यात ऋषभ पंतने आपल्यातील क्षमता सिद्ध केली. १३ व्या एकदिवसीय सामन्यात त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल अर्धशतक झळकावले. ११ कसोटी सामन्यात पंतच्या नावे २ शतकं आणि २ अर्धशतकं आहेत. पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. पण गेल्या काही सामन्यात त्याला सातत्यपूर्ण अपयश येत होते. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील खेळी त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 

...म्हणून महिला धावपटू दुती पुरुषांसोबत करते सराव

विंडीज विरुद्धच्या सामन्यात पंतने श्रेयस अय्यरच्या साथीनं ११४ धावांची भागीदारी केली. पंतने ६९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह  ७१ धावांची खेळी केली. या कामगिरीसह पंतने महेंद्रसिंह धोनी आणि इतर दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. चेपॉकच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत पंतचा समावेश झाला आहे.