पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : चाहतीने I Love You ऋषभ म्हटल्यावर पुढे काय झाले पाहा...

ऋषभ पंत

भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत अगदी थोड्या कालावधीत एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचे अनेक चाहते तयार झाले आहेत. स्टायलिश आणि हटके अंदाजामुळे अनेक तरूण मुलीही ऋषभ पंतच्या चाहत्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंतची बॅट मैदानावर तळपलेली नाही. तरीही त्यांच्या चाहत्यांमध्ये किंचितही घट झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच  मैदानावरील सरावावेळी एका २१ वर्षांच्या तरुणीने सगळ्यांसमोर ऋषभ पंतला प्रपोज केले. एकदम अचानक झालेल्या या गोष्टीमुळे ऋषभ लाजला गेला.

२६ सप्टेंबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर; युतीचा तिढा सोडवणार?

बंगळुरूमधील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी ऋषभ पंत मैदानावर आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. स्वाक्षरी देताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. पण त्याचवेळी चाहत्यांच्या गराड्यात एका तरुणीचा आवाज ऐकायला मिळाला. या चाहतीने सगळ्यांसमोर ऋषभला 'आय लव्ह यू ऋषभ', असे प्रपोज केले. या आवाजामुळे ऋषभ पंत एकदम गोंधळून गेला. त्याचवेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे तो लाजलाही. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते पण तो लाजला असल्याचेही जाणवत होते. सोशल मीडियावर सध्या ऋषभ पंत लाजल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

थकीत पगार न दिल्याच्या रागातून खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

ज्या तरुणीने ऋषभ पंतला प्रपोज केले होते. तिनेच आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.