पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCIच्या समालोचक पॅनलमधून संजय मांजरेकरांना बाहेरचा रस्ता

संजय मांजरेकर

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मांजरेकर गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचन पॅनलचे नियमित सदस्य आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आयपीएलमध्येही ते सहभागी होण्याची शक्यता कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे यंदा आयपीएलची सुरुवात २९ मार्चऐवजी आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

'मुंबई मिरर' ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यामुळेच मांजरेकर हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेसाठी धर्मशाळा येथे गेले नव्हते. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. या सामन्यात मांजरेकर यांचे सहकारी समालोचक सुनील गावसकर, मुरली कार्तिक आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन उपस्थित होते. 

संजय मांजरेकर यांनी आयसीसी विश्वचषक २०१९ दरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी मांजरेकर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही मांजरेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे सोडले नव्हते. कोलकाता येथे झालेली गुलाबी चेंडूवरील ऐतिहासिक कसोटी सामन्यावेळीही आपले सहकारी लोकप्रिय समालोचक हर्षा भोगले यांच्यावर भाष्य केले होते. हर्षा भोगले यांच्या क्रिकेट न खेळण्यावर भाष्य करुन त्यांनी वाद ओढावून घेतला होता.

नागपूरमधील मेयो रुग्णालयातून कोरोनाचे ५ संशयित रुग्ण पळाले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:report says sanjay manjrekar axed from bcci commentary panel may not be included in IPL 2020