भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करणाऱ्या सल्लागार समितीला (CAC) नोटीस बजावण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डीके जैन यांनी ही नोटीस पाठवली आहे. जर या प्रकरणाची चौकशी झाली आणि आरोप खरे ठरले तर भारतीय प्रशिक्षक पदाची नियुक्ती प्रक्रिया पुन्हा नव्याने होऊ शकते.
...म्हणून 'टॉस'साठी तीन 'कॅप्टन' मैदानात
दुसरीकडे हितसंबंधांसंदर्भातील नोटीसनंतर सल्लागार समितीचे (CAC) सदस्य आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे लवाद अधिकारी डीके जैन यांनी रवी शात्री यांची नियुक्ती करणाऱ्या माजी क्रिकेटर्संकडून याप्रकरणात १० आक्टोंबरपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांच्या समितीने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती केली होती.
'जेव्हा धोनी भाई परतला तेव्हा अश्रू अनावर झाले होते'
उल्लेखनीय आहे की, मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी या तिघांविरोधात हितसंबंधाची तक्रार केली आहे. सल्लागार समितीचा सदस्य एकावेळी अन्य कोण्यात्याही क्रिकेटच्या भूमिकेत काम करु शकत नाही, मात्र ही मंडळी अन्य ठिकाणी कार्यरत असल्याचा दावा संजीव गुप्ता यांनी केला आहे.