पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड

रवी शास्त्री

अखेर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. रवी शास्त्रीच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहे.  कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाच प्रशिक्षकपदावर कायम ठेवले आहे.

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्या व्यतिरिक्त अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी हे सहभागी आहेत. कपिल देव यांनी रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदी निवड केल्याची घोषणा करत सांगितले की, 'प्रशिक्षक पदाच्या दावेदारांमध्ये न्युझिलंडचे माइक हेसन दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी तिसऱ्या क्रमांकावर होते.' तसंच त्यांनी हे देखील सांगितले की, 'मुख्य प्रशिक्षकाची निवड करत असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे मत जाणून घेतले गेले नाही.'

सीबीटीसी प्रणालीमुळे तिन्ही मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणार

दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी सांगितले की, रवि शास्त्री भारतीय क्रिकेट संघाला जवळून ओळखतात. प्रत्येक खेळाडूला ते चांगले ओळखतात. भारतीय क्रिकेट संघाची व्यवस्था त्यांना माहिती आहे. तर अन्य दावेदारांना नव्याने सुरुवात करावी लागत असती.'

बजरंग पुनियाला 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर

तर, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाने ७० टक्के सामने जिंकले आहेत. अनिल कुंबळे यांनी चॅम्पियन चषकादरम्यान तडकाफडकी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर २०१७ मध्ये रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ५७ वर्षीय शास्त्री यांनी ऑगस्ट २०१४ ते २०१६ दरम्यान संघाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

बलुचिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले; ४ जणांचा मृत्यू