आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. धोनी धावबाद झाल्याचा तो क्षण आजही क्रिकेट चाहता विसरलेला नाही. तेव्हापासून धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो टी-२० विश्वचषकात खेळू शकतो, असे संकेत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी दिले आहेत.
'विराटच्या जन्मापूर्वीपासून टीम इंडिया जिंकतेय'
विराटच्या नेतृत्वाखाली विश्वचषक उंचावण्याची संधी हुकल्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघ दमदार कामगिरी करेल अशी प्रत्येक भारतीयाला आस आहे. विश्वचषकासाठी धोनीला संघात संधी मिळणार का? असा प्रश्न रवि शास्त्री यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली.
...म्हणून फुलराणी सायनाने मागितली चाहत्यांची माफी
शास्त्री म्हणाले की, आपण आता आयपीएलची प्रतीक्षाक करुयात. धोनी मैदानात कधी उतरतोय ते त्याच्यावर अवलंबून आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी देखील यासाठी निर्णायक ठरेल, असेही ते म्हणाले. आयपीएलमध्ये इतर यष्टिरक्षकांच्या तुलनेत धोनीची कामगिरी सरस ठरली, तर त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत शास्री यांनी दिले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील निवडीसाठी आयपीएल स्पर्धेतील कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाईल, असेही ते म्हणाले.