पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MS धोनी वनडे क्रिकेटला रामराम करेल, शास्त्रींनी वर्तवला अंदाज

महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्त्री

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करु शकतो, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.  धोनी केवळ टी-२० सामन्यावर फोकस करेल, असा अंदाज शास्त्रींनी एका मुलाखतीमध्ये वर्तवला आहे.  इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध महेंद्रसिंह धोनी अखेरचा सामना खेळला होता. उपांत्य सामन्यात धोनी धावबाद झाल्यानंतर टीम इंडियाचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न भंगले होते.  

IndvsSL: पुण्याच्या मैदानात कोहलीसमोर असेल हे 'विराट' चॅलेंज

सीएनएन न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल. वयानुसार तो टी-२० क्रिकेट खेळण्यावर भर देईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.  आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही शास्त्री यावेळी म्हणाले. भविष्यात कोणता निर्णय घ्यावा यासाठी धोनीला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. तो योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वीला पुन्हा दुखापतीचं 'ग्रहण'

यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर तो भारतीय संघाचा भाग असेल की नाही, हे ठरण्याची शक्यता यापूर्वी रवी शास्त्री यांनी बोलून दाखवली होती. धोनी एकदिवीयला अलविदा करुन टी-२० वर फोकस करण्याचा त्यांचा अंदाज खरा ठरला तर भारतीय संघाला पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार पुन्हा एकदा संघासोबत दिसू शकेल. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदाच होईल. विश्वचषकापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो जोपर्यंत खेळायला सुरुवात करत नाही तोपर्यंत त्याची संघात वर्णी लागणार का? याबाबतची चर्चा फुकाची ठरेल.