पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: हा बाबा वर्ल्डकपमध्ये दमवणार, त्सुनामीची चाहूल देणारी हॅटट्रिक

राशीद खान

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषकात प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरणाक आहे. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत बिग बॅश लीग (BBL) मधील कामगिरीमुळे राशिद विश्वचषकात हंगामा करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिसत आहेत. बिग बॅग लीगच्या २७ व्या सामन्यात अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळणाऱ्या राशिदने टी-२० स्पर्धेत आणखी एक हॅटट्रिक आपल्या नावे केली आहे.   

IndvsSL 2nd T20: कोहलीच्या षटकारासह भारताचा 'विराट' विजय

ओव्हलच्या मैदानात अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर यांच्यात रंगलेल्या सामन्यात राशिदन सिडनीच्या तीन गड्यांना लागोपाठ बाद करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीनंतरही अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय सामन्यात चार चेंडूत चार गडी बाद करणाऱ्या राशिदची टी-२० मधील ही तिसरी हॅटट्रिक आहे. यापूर्वी २०१७ मध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत राशिदने जमैका थलायवाज विरुद्ध  तीन चेंडूत तीन बळी टिपले होते. 

भावा कुस्तीत दोस्ती नाय अन् कुस्तीनंतर अशी दोस्ती पण दिसायची नाय!

डावातील ११ व्या आणि आपल्या कोट्यातील तिसऱ्या षटकात राशिद खानने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर जेम्स विंसला अ‍ॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. अखेरच्या चेंडूवर त्याने जॅकएडवर्ड्सला पायचित केले. डावातील १३ व्या आणि आपल्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर जोर्डन सिल्कला क्लीन बोल्ड करत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली. सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीमध्ये राशिदला नावाला साजेशा खेळ करता आला नाही. मात्र फलंदाजीत त्याने ही कसर पूरी केली. त्याने ४ षटकात २२ धावा खर्च करत ४ महत्त्वपूर्ण बळी टिपले. मात्र त्याच्या या कामगिरीनंतरही प्रतिस्पर्धी संघाने २ गडी राखून सामना खिशात घातला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rashid khan takes another hat trick in t20 cricket during bbl game between adelaide strikers vs sydney sixers