पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफगाणिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी कर्तृत्ववान फिरकीपटू राशिदकडे

राशिद खान

विश्वचषक स्पर्धेनंतर अफगाणिस्तान क्रिकेटने क्रिकेटच्या सर्व प्रकारातील नेतृत्वाची जबाबदारी आता अष्टपैलू राशिद खानकडे दिली आहे. यापूर्वी गुलबदीन नैबी  अफगाणिस्तान संघाच्या एकदिवसीय संघाचे, राशिद टी-२० तर रहमत खान कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदी होते.

शुक्रवारी अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने तिन्ही प्रकारातील नेतृत्व हे राशिदकडे सोपवण्यात आल्याची घोषणा केली. असगर अफगानकेड उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने काही सामन्यात संघर्षमय खेळ दाखवला. मात्र, त्यांना ९ पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. परिणामी विश्वचषकात अफगाणिस्तानचा गुणतालिकेत तळालाच राहिले. 

फलंदाजी प्रशिक्षक बांगर यांना मुदतवाढ मिळणे 'मुश्किल'

२० वर्षीय राशिदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसह बांगलादेश, झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे. आक्टोबरमध्ये अफगाणिस्तान वेस्ट इंडिजविरुद्धही मालिका खेळेल. राशीदच्या नेतृत्वाखील संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

तिकीटेच नसल्यामुळे टीम इंडियाचा परतीचा प्रवास लांबला...