पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : मैदानावर साप आल्याने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला उशीर

विजयवाडातील मैदानावर आलेला साप

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयवाडा येथे अ गटातील आंध्र प्रदेश विरुद्ध विदर्भाचा सामना सुरू होण्याला सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे उशीर झाला. विजयवाडा येथील डॉ. गोकाराजू लैला गंगाराजू क्रिकेट मैदानावर साप आल्याने खेळ सुरू करण्याला उशीर झाला. 

राजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास - नरेंद्र मोदी

विदर्भाचा कर्णधार फैज फैजल याने नाणेफेक जिंकली आणि सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व क्रिकेटपटू मैदानात आल्यावर खेळ सुरू होणार इतक्यात खेळपट्टीजवळ साप आल्याचे दिसले. त्यामुळे खेळ सुरू झाला नाही. सापाला बाहेर काढल्यानंतरच खेळाला सुरुवात झाली.

बीसीसीआय डॉमेस्टिक या अधिकृत ट्विटर हँडलवरून या घटनेचा १३ सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. मैदानावर साप बघून अनेक क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले. 

'अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही'

स्थानिक कर्मचाऱ्यांनी मैदानातून सापाला बाहेर काढल्यावर पुन्हा खेळाला सुरुवात झाली.