पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ranji Trophy: ७३ वर्षांत पहिल्यांदाच सौराष्ट्र चॅम्पियन

Ranji Trophy: ७३ वर्षांत पहिल्यांदाच सौराष्ट्र चॅम्पियन (PTI)

सौराष्ट्रने पहिल्या डावातील पश्चिम बंगालवरील आघाडीच्या जोरावर रणजी चषकावर आपले नाव कोरले आहे. सौराष्ट्रने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या. तर बंगालचा संघ पहिल्या डावात ३८१ धावांवर संपुष्टात आला होता. 

IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय

अनुस्तुप मुझूमदार (६३) आणि अर्णव नंदीने (नाबाद ४०) गुरुवारी अंतिम सत्रात ९१ धावा करुन टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु, सेमीफायनलमध्ये गुजरातविरोधात शेवटच्या दिवशी सात विकेट घेऊन सौराष्ट्रला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा कर्णधार जयदेव उनाडकटने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने अंतिम सामन्यातही जबरदस्त गोलंदाजी करुन सौराष्ट्र टीमचे नाव रणजी इतिहासात नोंदवले. डाव्या हाताच्या या गोलंदाजाने मुझूमदाराला पायचीत केले आणि नंतर आकाशदीपला धावबाद केले. हे दोघे तीन चेंडूत बाद झाल्याने सामन्याचा नूरच पालटला. 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं

सकाळच्या सत्रात एका तास १० मिनिटांचा खेळ महत्त्वाचा ठरला. यादरम्यान २७ धावा निघाल्या आणि बंगालने आपले उर्वरित चारही विकेट गमावल्या. त्यांचा संपूर्ण संघ ३८१ धावांवर बाद झाला. अशा पद्धतीने सौराष्ट्रने पहिल्या डावातील ४४ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावातील सामन्याच्या पाचव्या दिवशी सौराष्ट्रने चार गड्यांच्या बदल्यात १०५ धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्रने विजय मिळवला.

INDvsSA : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे चित्र दिसले