पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून BCCI च्या सिलेक्टरला या संघाच्या ड्रेसिंगरुममधून हाकलले

रणजी क्रिकेट स्पर्धेदरम्यान हा सर्व प्रकार घडला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे सदस्य (सिलेक्टर) असलेल्या देवांग गांधी यांना ड्रेसिंगरुममधून हाकलण्याचा प्रकार समोर आला आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानात पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सामन्यादरम्यान गुरुवारी हा प्रकार घडला. राष्ट्रीय सिलेक्टर देवांग गांधी यांना बीसीसीआय भ्रष्टाचारविरोधी समितीचे अधिकारी सौमेन कमार्कर यांनी बंगालच्या ड्रेसिंगरुमध्ये बाहेर काढले.

मेरी कोमनं प्रतिस्पर्धी झरीनला रिंगबाहेरही फटकारले

देवांग गांधी यांनी ड्रेसिंगरुममध्ये प्रवेश केल्यानंतर  बंगालच्या वरिष्ठ खेळाडूने प्रॉटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला होता. भ्रष्टाचार विरोधक प्रोटोकॉलनुसार, सामन्यासाठी निवड झालेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशिवाय अन्य कोणालाही ड्रेसिंगरुममध्ये प्रवेश करता येत नाही. यासंदर्भात बंगालचा माजी कर्णधार आणि टीम सदस्य मनोज तिवारी म्हणाला की, 'आपल्याला भ्रष्टाचार विरोधी  प्रोटोकॉलचे पालन करायला हवे. एक नॅशनल सिलेक्टर परवानगीशिवाय ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकत नाही.  

ICC WTC Point Table: कांगारु करताहेत टीम इंडियाचा पाठलाग

प्रोटोकॉलचा दाखला देत मनोज तिवारी याने देवांग गांधी यांच्या ड्रेसिंग रुममधील प्रवेशावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर देवांग गांधी यांना ड्रेसिंग रुममधून बाहेर काढण्यात आले. रणजी चषक स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पश्चिम बंगाल आणि आध्रं प्रदेश यांच्यात ईडन गार्डनवर सामना खेळवण्यात आला. यजमान बंगालने पहिल्या डावात २८९ धावा केल्या होत्या. आंध्र प्रदेशचा पहिला डाव १८१ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात बंगालने बिनबाद ४६ धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णत स्थितीत संपला होता. बंगालकडून अभिषेक रमनने पहिल्या डावात ११२ धावांची शतकी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ranji Trophy 2019 20 National selector Devang Gandhi removed from Bengal dressing room after Manoj Tiwary complaint