रणजी चषकातील २०१९-२० च्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाची निवड करण्यात आली आहे. निलंबनानंतर पृथ्वी शॉ पुन्हा कमबॅक करत असून भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नेतृत्वाची धूरा ही सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आली असून उपकर्णधारपदाची जबाबदारी आदित्य तारेकडे सोपवण्यात आली आहे.
'बलॉन डी आर' पुरस्काराच्या षटकारासह मेस्सीचा नवा विक्रम
विंडीज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांना पहिल्या सामन्यासाठी संघातून वगळ्यात आले आहे. भारतीय संघाची कसोटी मालिका आता दोन महिन्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी अजिंक्य रहाणेला रणजीमध्ये अधिक मेहनत घेण्याची संधी देण्यात आली आहे.
IPL 2020 Auction: ९७१ क्रिकेटर्सची नोंदणी, यात २०० हून अधिक परदेशी
डोपींग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर पृथ्वी शॉला निलंबनाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता रणजीमध्ये चांगली कामगिरी करुन पृथ्वी शॉ भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. यापूर्वी उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या सरफराज खानने मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. विक्रमी ४१ वेळा रणजी चषक उंचावणाऱ्या मुंबईचा संघ ९ डिसेंबरपासून बडोद्याविरुद्धच्या सामन्याने रणजीच्या नव्या हंगामाला सुरुवात करेल.
टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!
मुंबईचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तारे (उप कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, शुभम रंजने, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोइर, शशांक अटार्डे, शार्दुल ठाकुर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, एकनाथ केरकर.