पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिमानास्पद! राणी ठरली 'अ‍ॅथलेट ऑफ द इयर २०१९' पुरस्काराची मानकरी

राणी रामपाल

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर तमाम हॉकी जगताला एक अनोखा सन्मान मिळवून दिलाय. तिने प्रतिष्ठित 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलेट ऑफ द इयर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. 'द वर्ल्ड गेम्स' ने जगभरातील क्रीडा प्रेमींच्या मतदानानंतर २० दिवसांनी या स्पर्धेतील विजेत्यांचे नाव गुरुवारी घोषित केले. राणी हा पुरस्कार पटकवणारी पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.  

तिची अन् कोहलीची सोशल मीडियावर 'विराट' चर्चा!

'द वर्ल्ड गेम्स' च्यावतीने एका पत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. हॉकीच्या मैदानातील सुपर स्टार राणी अ‍ॅथलेट ऑफ द इयर २०१९ पुरस्काराची मानकरी ठरल्याचे त्यांनी घोषित केले. राणीला १ लाख ९९ हजार ४७७ मते मिळाली. जानेवारीमध्ये जगभरातील क्रीडा प्रेमींनी यासाठी मतदान केले होते. ही प्रक्रिया तब्बल २० दिवस चालली होती.  यामध्ये  एकूण ७ लाख ५ हजार ६१० क्रीडा प्रेमींनी मतदान केले. मागील वर्षी भारतीय महिला संघाने  एफआयएच सीरीज फाइनल्स जिंकली होती. या स्पर्धेत राणीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.  राणीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली आहे.  

'परमेश्वराच्या मनात असेल तर सायना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल'

हा पुरस्कार हॉकी क्षेत्रासह माझा संघ आणि देशाला समर्पित आहे, अशा शब्दात राणीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॉकीचे चाहते, सरकार, प्रशिक्षक आणि बॉलिवूडचे माझे मित्र आणि देशवासियांच्या समर्थनामुळे हा सन्मान मिळाला, असेही राणीने म्हटले आहे. या पुरस्कारासाठी 'एफआयएच' ने राणीची शिफारस केली होती. त्यांचेही राणीने आभार मानले आहेत. या पुरस्कारासाठी विविध क्रीडा क्षेत्रातील २५ खेळाडूंना नामांकित करण्यात आले होते. आंतरराष्ट्री हॉकी महासंघाने ट्विटच्या माध्यमातून राणीला शुभेच्छा दिल्या आहेत. पुरस्काराच्या शर्यतीत यूक्रेनचा कराटे चॅम्पियन स्टेनिसलाव होरुना आणि कॅनडाची पावरलिफ्टिंग विश्व चँम्पियन रिया स्टिन यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.