पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खेलरत्नसाठी नेमबाज हिना आणि अंकुरनेही लक्ष्य वेधलं

हिना सिंधू

नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरआय) ने महिला नेमबाज हिना सिंधू आणि पुरुष गटातून अंकुर मित्तल यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी आजच (सोमवारी)  भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांची खेलरत्नसाठी शिफारस केली आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत दोन वेगवेगळ्या क्षेत्रातून  चार नावांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. हिना आणि अंकुर यांच्याशिवाय नॅशनल रायफल असोसिएशनकडून अंजुम मोदगिल, शाहजार रिझवी आणि ओम प्रकाश मिथरवाल यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आली असून जसपाल राणा आणि रौणक पंडित यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

आशियाई क्रीडा प्रकारात कांस्य पदक विजेत्या हिनाने २०१३ मध्ये आयएसएसएफ विश्व कपच्या अंतिम फेरीत १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण वेध साधला होता. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. २९ वर्षीय हिना महिला गटातील  १० मी. एअर पिस्टल प्रकारात रौप्य आणि २५ मी. एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले होते. नेमबाजीतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर २०१४ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

पुरुष गटात अंकुरने २०१८ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आयएसएफ जागतिक नेमबाजी चॅम्पियनशीप डबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. याशिवाय २०१७ मध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले होते.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rajiv gandhi khel ratna award heena sidhu ankur mittal recommendation By National Rifle Association of India