पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतभेदांमुळे रजत शर्मांनी DDCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

रजत शर्मा

ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी शनिवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. संघटनेतील दबावामुळे त्यांच्यासाठी काम करणे मला शक्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

गोव्यात मिग विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

गेल्या २० महिन्यांच्या त्यांच्या कार्यकाळात सरचिटणीस विनोद तिहारा यांच्याबरोबरील मतभेद सार्वजनिक झाले होते. तिहारा यांना संघटनेअंतर्गत मोठा पाठिंबा मिळत आहे. आपल्या निवेदनात शर्मा म्हणाले की, इथे क्रिकेट प्रशासन प्रत्येकवेळी दबावात काम करत आहे. मला वाटते की, इथे वैयक्तिक स्वार्थ प्रत्येकवेळी क्रिकेटच्या हितांविरोधात काम करत राहतात. 

ते म्हणाले, मला वाटते की प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि एकत्रित काम करणे शक्य नव्हते, आणि मी कोणत्याही स्तरावर तडजोड करु इच्छित नव्हतो. माझ्या कार्यकाळात अनेक गोष्टी विरोधात घडत होत होत्या. त्यासाठी मी स्वतःच यापासून वेगळा झालो आहे. मी डीडीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पाठिंब्यानंतर रजत शर्मा हे डीडीसीएशी जोडले गेले होते. डीडीसीएतील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण जेटलींच्या निधनांनंतर रजत शर्मा हे एकाकी पडले होते. कारण जेटली त्यांची ताकद होती.