पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इशांत शर्माची दुखापत द्रविड यांना गोत्यात आणणार

इशांत शर्मा

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांच्यातील वाद चव्हाट्यावर येण्याचे संकेत आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने राष्ट्रीय अकादमीमध्ये दाखल होणाऱ्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या रिहॅबिलेशनच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी खेळडूंची जबाबदारी स्वीकारुन यावर तोडगा काढायला हवा, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

INDvSA: या ताफ्यासह आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार

दुखापतीनंतर भारतीय संघातील खेळाडूंना बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट (तंदुरुस्ती चाचणी) द्यावी लागते. एनसीएने बुमराहची फिटनेस चाचणीला नकार दिला होता. तर इशांत शर्माला चाचणीनंतर फिट घोषित करण्यात आले होते. मात्र पहिल्या कसोटीनंतर इशांत शर्मा पुन्हा दुखापतग्रस्त झाला. परिणामी त्याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले. 

आक्रमकपणाच्या प्रश्नावर कोहली पत्रकारावर चिडला

द्रविड यांच्या कोचिंगवर टीका करणे म्हणजे परमेश्वराची निंदा केल्यासारखे आहे. द्रविड खेळाडू म्हणून आदर कधीही कमी होणार नाही. पण प्रशासक म्हणून त्याचा प्रवास ठिक वाटत नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. इशांत शर्माला फिट घोषीत केले त्यावेळीचे स्कॅन रिपोर्ट आणि आताचे स्कॅन रिपोर्ट पाहून एनसीएत नक्की काय सुरु आहे, हे समोर येईल, असेही ते म्हणाले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahul Dravid should take responsibility for NCA blunders BCCI official after Ishant Sharma re injury