पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सन ऑफ मिस्टर रिलायबल' समितचे दोन महिन्यांच्या आता दुसरे द्विशतक!

राहुल द्रविड यांचा मुलगा समितची लक्षवेधी खेळी

भारताचे माजी कर्णधार आणि मध्यफळीतील प्रमुख आधार राहुल द्रविड यांचा मुलगाही बाबांच्या पावलावर पावले टाकत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. ज्यूनियर क्रिकेटमध्ये समित द्रविडने दोन महिन्याच्या आत दुसरे द्विशतक झळकावले आहे. १४ वर्षीय समितने वडिलांप्रमाणे सातत्यपूर्ण खेळी करुन दाखवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी

१४ वर्षांखालील बीटीआर शील्ड स्पर्धेत सोमवारी माल्या अदिती इंटरनॅशनल स्कूल आणि श्री कुमारन यांच्यात सामना झाला. या सामन्यात समितने द्विशतकी खेळी केली. समितने आपल्या २०४ धावांच्या खेळीत ३३ चौकार खेचले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर अदिती इंटरनॅशनल स्कूलने ३ बाद ३७७ धावा केल्या. 

Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी

फलंदाजीनंतर समितने गोलंदाजीमध्येही कमाल करुन दाखवली त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या दोन गड्यांना तंबूत धाडले. धावांचा पाठलाग करताना श्री कुमारन संघाचा डाव अवघ्या ११० डावात आटोपला. माल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलने हा सामना २६७ धावांनी जिंकला. यापूर्वी डिसेंबरमध्ये वाइस प्रेसिडेंट XI कडून धर्वाड झोनविरुद्धच्या १४ वर्षाखालील अंतरविभागीय स्पर्धेत समितने द्विशतकी खेळी केली होती. त्यावेळी समितने पहिल्या डावात २५६ चेंडूत २०१ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात ९४ धावा कुटल्या होत्या.