पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल द्रविड 'लाभार्थी' नाही! हितसंबंधाच्या प्रकरणातून दोषमुक्त

राहुल द्रविड

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या द्रविड यांना लाभाचं पद भूषवल्याच्या आरोपातून दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी गुरुवारी राहुल द्रविड यांच्यावरील हितसंबंधाच्या प्रकरणातील निकाल दिला. द्रविड कोणत्याही प्रकारच्या लाभाचे पद भूषवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

दुती चंद 'टाइम 100 नेक्स्ट'च्या यादीत, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

पीटीआय वृत्तानुसार, जैन म्हणाले की, द्रविडवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य दिसत नाही. तो भूषवत असलेल्या पदामध्ये कोणत्याही प्रकारे हितसंबंध जपल्याचे किंवा लाभ मिळवण्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे याप्रकरणातून द्रविडला दिलासा मिळाला आहे. 

पाकची दहा वर्षांची प्रतिक्षा संपली, मायदेशात कसोटी मालिका ठरली

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविड यांच्याविरोधात हितसंबंधासंदर्भात तक्रार दाखल केली होती. राहुल द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षासोबत इंडियन सिमेंट कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर द्रविड यांनी दिर्घ रजेवर असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.