पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीर्घकालीन रजेमुळे द्रविड दुहेरी लाभाच्या आरोपातून निर्दोष ठरणार?

राहुल द्रविड

परस्पर हितसंबंधाच्या प्रकरणात माजी कर्णधार आणि भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड १२ नोव्हेंबरला लोकपाल डी.के.जैन यांच्यासमोर हजर रहावे लागणार आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट संस्थेच्या प्रमुखपदी असताना तो श्रीनीवासन यांच्या इंडियन सिमेंट कंपनीत कार्यरत आहे. आयपीएलमध्ये श्रीनीवासन यांचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ खेळतो, ज्यामुळे राहुल द्रविडवर परस्पर हितसंबंध जपल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

IND vs BAN : दिल्लीतील सामन्यावर गांगुलींकडूनही मोहोर!

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी राहुल द्रविडला नोटीस बजावली आहे. याप्रकरणात द्रविडने आपली बाजू मांडताना म्हटले होते की, इंडियन सिमेंट कंपनीतून मी दीर्घकालीन रजेवर आहे.  सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी द्रविडची पाठराखण केली होती. दिर्घकालीन सुट्टीवर असल्यामुळे द्रविड हितसंबंधापासून दूर असल्याचे ते म्हणाले होते.  

दुहेरी हितसंबंध प्रकरणातील सचिनवरील आरोप BCCI लवादाने फेटाळला

यापूर्वी संजीव गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्याविरोधात देखील तक्रार केली होती. माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्या कार्यकाळात येणारा निकाल कशा प्रकारचा असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.