पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युवा राहुल चहरच्या यशातही धोनीचा हात

राहुल चहर

पठाण बंधू आणि पांड्या बंधू यांच्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघात चहर बंधूची निवड झाली आहे. विंडीज दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी दीपक चहर आणि राहुल चहर यांची निवड झाल्यानंतर चाहर कुटुंबियांत आनंदाचे वातावरण आहे. 

राहुलचे वडील देश राज आयएएनएसशी बोलताना म्हणाले की, दोघांची एकाच वेळी राष्ट्रीय संघात झालेली निवड अभिमानास्पद आहे. दीपक आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. तर रायजिंग पुणे सुपर जाएट्स संघाकडून खेळताना धोनीने राहुला धोनीची खूप मदत मिळाली आहे. धोनी कधीही माझ्या मदतीसाठी तयार असतो, असे राहुलने सांगितल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

INDvsWI: चौथ्या क्रमांकासाठी कोण सक्षम ठरेल?

चेंडू आणि बॅट हातात घेणारा प्रत्येकाला एक दिवस भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न असते. हेच आमच्या मुलांचेही स्वप्न होते. आमच्या दोन्ही मुलांची स्वप्नपूर्ती झाली. आयपीएल २०१९ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना राहुलने कमालीची कामगिरी केली होती. या कामगिरीमुळेच त्याला संघात स्थान मिळण्यास मदत झाली.  

'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rahul chahar said to his father dhoni sir helped me a lot during his time with pune supergiants in ipl