पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ISSF Shooting World Cup सुवर्ण वेध साधत राहीने मिळवला ऑलिम्पिक कोटा

नेमबाज राही सरनोबत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने जर्मनीमधील म्युनिक शहरात सुरु असलेल्या विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण वेध साधला. सोमवारी २५ मीटर पिस्तुल प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीसह तिने टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटाही मिळवला आहे.

राहुल चहरचा कहर, श्रीलंका 'अ' विरुद्ध भारत 'अ' संघाचा मोठा विजय

राहीला युक्रेनच्या कोस्टेवेक ओलेना हिने चांगली टक्कर दिली.  मात्र अखेर राहीने  सुवर्ण पदकावर नाव कोरले. २८ वर्षीय  राही सरनोबत नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवणारी पहिली महिला नेमबाज आहे. तिने २०१२ मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. त्यानंतर दुखापतीनंतर २०१६ मध्ये तिला स्पर्धेला मुकावे लागले होते. आता २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये ती भारतासाठी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्जून पुरस्कार विजेत्या राहीने २०१३ मध्ये चांगवन वर्ल्ड कपमध्ये देखील सुवर्ण कमाई केली होती. याशिवाय आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.   

WC Warmup Match : भारत दुसऱ्या ट्रायलध्ये बांगलादेशला तरी झिंगवणार का?

दुसरीकडे याच प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीनेही पुरुष गटातून सुवर्ण पदकाची कमाई केली. १७ वर्षीय नेमबाज  सौरभ चौधरीने म्युनिचमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये १० मिटर एअर पिस्तुल प्रकारात स्वत:चा विश्व विक्रम मोडत त्याने २४५ गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.