पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US OPEN 2019: नदालची अंतिम फेरीत धडक

राफेल नदाल

अमेरिका ओपन स्पर्धेतील तीनवेळचा चॅम्पियन असलेल्या स्पेनिश राफेल नदालने यंदाच्या वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इटलीच्या मॅटियो बेरेटिनीला  ७-६ (८-६), ६-४, ६-१ असे पराभूत करत नदालने अंतिम फेरी गाठली.  

US OPEN 2019: महिला एकेरीत युवा जोश अन् अनुभवी होश यांच्यात फायनल

ऑर्थर अ‍ॅश स्टेडियमवर रंगलेल्या उपांत्य सामन्यातील पहिल्या दोन सेटमध्ये नदालला चांगलाच संघर्ष करावा लागला. टाय ब्रेकपर्यंत गेलेल्या पहिल्या सेटमध्ये नदालने ८-६ असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्येही  बेरेटिनीने चांगला संघर्ष केला पण सर्विसच्या भेदक माऱ्यानं नदालने त्याला बॅकफूटवर ढकलले.  

 

'थ्रीडी गॉगल'च्या ट्विटचा पश्चाताप नाही : रायडू

अंतिम सामन्यात नदालसमोर दानिल मेदवेदेव याचे आव्हान असणार आहे. यंदाच्या स्पर्धेत मेदवदेवने संयमी खेळ दाखवत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. मेदवेदेवने चौथ्या फेरीत फेडररला पराभूत करणाऱ्या दिमित्रोवाला पराभूत केले होते. एका हंगामात कॅनडा, सिनसिनाटी आणि अमेरिका ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा मेदवेदेव तिसरा टेनिसपटू आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नदाल आणि मेदवेदेव यांच्यातील रोमहर्षक लढत पाहायला मिळेल.