पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नदालचा नादखुळा परफॉमन्स! वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा अव्वलस्थानी

राफेल नदाल

स्पॅनिश टेनिस स्टार तब्बल एका वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. राफेल नदाल मागील वर्षातील ४ नोव्हेंबरला अव्वलस्थानी होता. तब्बल १९६ दिवस या स्थानवार विराजमान राहिल्यानंतर त्याची अव्वलस्थानावरुन घसरण झाली होती. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला मागे टाकत त्याने पुन्हा एकदा अव्वलस्थानावर कब्जा केला आहे.  

Video : संघ हरला, पण कार्तिकनं तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

विशेष म्हणजे नोव्हाक जोकोविचने पॅरिस मास्टर्स स्पर्धा पाचव्यांदा जिंकूनही तो नदालला नंबर वन होण्यापासून रोखू शकला नाही.  १९७३ नंतर एटीपी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहचणारा दुसरा वयोवृद्ध खेळाडू आहे. यापूर्वी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २०१८ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी अव्वलस्थानी झेप घेतली होती.  

China Open : श्रीकांतची माघार, सिंधू-सायनाकडून विजयी प्रवाहाची आस

३३ वर्षीय नदालने जोकोविचला दुसऱ्या स्थानावर ढकलत पाचव्यांदा वर्षाच्या अखेरीस अव्वलस्थानी विराजमान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नदालने यापूर्वी  २००८, २०१०, २०१३ आणि २०१७ यावर्षाच्या शेवटी अव्वलस्थानी राहण्याचा मान मिळवला आहे.