पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI 'सिलेक्टर्सं'च्या मुलाखतीत धोनीच्या भविष्याबाबतचा प्रश्न

महेंद्रसिंह धोनी

बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्ष नियुक्तीवेळी मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांना महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मदनलाल यांच्या अध्यक्षतेखालील तसेच आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक सल्लागार समितीच्यासदस्यांनी बुधवारी मुंबईमध्ये पाच माजी क्रिकेटर्सची मुलाखत घेतली. यात सुनील जोशी यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली असून हरविंद्र सिंह यांनाही निवड समितीच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

सोळावं वरीस मोक्याचं! शेफालीनं तोऱ्यात गाठलं अव्वलस्थान

बीसीसीआय निवड समितीच्या दोन रिक्त जागेसाठी लक्ष्म शिवरामकृष्णन, वेंकटेश प्रसादस राजेश चौहान, सुनील जोशी आणि हरविंद्र सिंह यांची मुलाखत घेतली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, सल्लागार समितीने या उमेदवारांना धोनीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला होता. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात धोनीला संघात घेण्यासंदर्भात काय भूमिका घ्याल? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. 
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडने सेमीफायनलमध्येच भारताला घरचा रस्ता दाखवला होता.

BCCI निवड समितीच्या अध्यक्षपदी सुनील जोशींची वर्णी

या सामन्यानंतर धोनी भारतीय संघापासून दूर आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीने तयारी सुरु केली आहे. धोनीच्या निवडीसंदर्भातील विषय संवेदनशील असल्यामुळे निवड समितीमध्ये येऊ पाहणाऱ्यांना त्याच्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे स्पष्टीकरणही बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले. सुनील जोशी यांच्यासमोर हा एक मोठा प्रश्न असणार आहे. यापूर्वीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीसंदर्भात बीसीसीआयकडून कोणतीही ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले नव्हते. धोनी मैदानात उतरल्यानंतरच त्याला संघात स्थान मिळणार की नाही हे सांगता येईल, अशी भूमिका एमएसके प्रसाद यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलच्या मैदानातून धोनी कमबॅक करत असून सुनील जोशींचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.