पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुदीरमन चषक : सायना, सिंधू, श्रीकांतवर भारताची मदार

सायना सिंधू PV Sindhu, Saina Nehwal

ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि पुरुष गटातील भारताचा आघाडीचा टेनिसपटू किदम्बी श्रीकांत चीनमध्ये रंगणाऱ्या सुदीरमन चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे  प्रतिनिधीत्व करणार आहेत. चीनच्या नानजिंग येथे १९ ते २६ मे रोजी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.   

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत चारवेळा विजेतपद पटकवणाऱ्या पी. व्ही. सिंधूने २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. तर २०१२ मध्ये लंडन येथे रंगलेल्या ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदकाची कमाई केली होती. या दोघींमुळे भारताचा संघ अधिक मजबूत होईल. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेला श्रीकांतमुळे भारताचे बळ आणखी वाढेल. 

यापूर्वी आस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या मिश्र प्रकारात भारतीय संघाने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाला आठवे स्थान देण्यात आले असून  'ड' गटात भारतासमोर यजमान चीन आणि मलेशियाच्या संघाचे तगडे आव्हान असणार आहे. या गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.   

गतवर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील मिश्र बॅडमिंटन प्रकारात भारताने  मलेशियाला पराभूत करतसुवर्ण कमाई केली होती. याशिवाय चीनमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेला ली चोंग वेई मलेशिया संघासोबत नाही. याचा भारताला मलेशियाविरुद्धच्या सामन्यात फायदा होईल. 

भारताच्या १३ सदस्यीय संघात सायना, सिंधू आणि श्रीकांत या नावाजलेल्या खेळाडूंशिवाय सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असणाऱ्या समीर वर्मासह दुखापतीतून सावरलेल्या सात्वीकसाईराज आणि रंकी रड्डी यांचाही समावेश करण्यात आला आहे. सात्विक साईराज पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीसोबत कोर्टवर उतरेल. 

पुरुष: किदम्ही श्रीकांत, समीर वर्मा, सात्विकसाईराज, रंकी रेड्डी, चिराग शेट्टी, मनु अत्री, बी सुमित रेड्डी आणि प्रणव जैरी चोपडा 
महिला: पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, एन सिक्की रेड्डी, पूर्विशा एस राम आमि जे मेघना.