पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

China Open : सिंधू आउट! बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्यासमोर हतबल

पी.व्ही. सिंधू

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूचे चीन ओपन बॅडमिंटनमधील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. महिला एकेरीत तिला बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. चीनी तायपे की पाई यू पो हिने संघर्षमय लढतीत सिंधूला २१-१३, १८-२१,२१-१९ अशा फरकाने मात दिली.

टी-१० लीग : अभिनेत्री सनी लिओनी या संघाची ब्रँड अँबेसिडर

जागतिक क्रमवारी ४२ व्या स्थानावर असलेल्या तायपेचा सिंधू विरुद्ध आतापर्ंयत खेळलेल्या चार सामन्यातील हा पहिला विजय आहे.  
बॅडमिंटनच्या कोर्टवर चीन ओपनची सुरुवात एकदमच खराब झाली आहे. सिंधू सोबतच पुरुष एकेरीमध्ये एच एस प्रणय आणि महिला मिश्र प्रकारात अश्विनी पोनप्मा आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

गावाकडच्या आठवणी सांगत अजिंक्य म्हणाला, शेतकरीच रिअल हिरो  

प्रणयला डेन्मार्कच्या के रासमस गेमके ५३ मिनिटांच्या सामन्यात १७-२१, १८-२१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. यापूर्वी जपान ओपनमध्ये त्याने प्रणयला पराभूत केले होते.  महिला मिश्र प्रकारात पोनप्पा-सिक्की या जोडीला चीनच्या  ली वेन मेई आणि झेंग यू की जोडीने ३० मिनिटात ९-२१, ८-२१ अशा फरकाने खेळ खल्लास केला.