पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

China Open 2019 : सायनाचा संघर्ष कायम,सिंधूची आगेकूच

पी.व्ही. सिंधू

भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने चीन ओपन स्पर्धेत दिमाखदार विजय नोंदवत उप उपांत्यफेरीत प्रवेश केला. चीनमधील चांगझोऊ कोर्टवर बुधवारी ३४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने ऑलम्पिक सुवर्ण विजेत्या ली झुरुईला २१-१८, २१-१२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. 

वयाच्या ४२ व्या वर्षी दिनेश मोंगियाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

दुसरीकडे महिला एकेरीतील सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. लंडन ऑलम्पिंक कास्यपदक विजेत्या सायनाला थायलंडच्या बुसानन ओनग्बमुरगपन हिने १०-२१,१७-२१ असे पराभूत केले. दुखापतीनंतर कोर्टवर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या सायनाचा सध्या संघर्षमयी प्रवास सुरु आहे.

 

ATP rankings : फेडररसमोर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या नागलची मोठी झेप

यंदाच्या वर्षात इंडोनेशिया ओपनच्या विजेतेपदाने तिने चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत तिला पोहचता आलेले नाही. पुरुष एकेरीत बी. साई प्रणितने थायलंडच्या सिपीयानयू अव्हियिंगसोननला २१-१९,२१-२३,२१-१४ अशा फरकाने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PV Sindhu advances after easy win over Li Xuerui Sai Praneeth enters 2nd round of China Open