पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UTT : पुणेरी पलटण सलामीच्या सामन्यात दबंग दिल्लीशी भिडणार

पुणेरी पलटणचा संघ

प्रो कबड्डीनंतर भारतीय अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात पुणेरी पलटणचा संघ सहभागी झाला आहे. गुरुवारी पुणेरी पलटन  दबंग दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्याने यूटीटी स्पर्धेतील आपला शुभारंभाचा सामना खेळेल. ७ वाजल्या पासून स्टार स्पोर्ट्स याचे प्रक्षेपण होणार आहे.  

कटकमधील २१ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये दिमाखदार कामगिरी करणारा हरमीत देसाई संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्याशिवाय सध्याचा घडीला यूटीटीच्या जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर असणारा चुआंग चिह-युआन यांचा सहभाग संघासाठी फायदेशीर ठरेल. भारतातील युवा खेळाडू आणि परदेशी खेळाडूंसह संघ संतुलित असल्याचे मत अनुभवी प्रशिक्षक फ्रांसिस्को सॅंटोस यांनी सामन्यापूर्वी व्यक्त केले. 

पुणेरी पलटन हा यूटीटीमधील एक नवीन संघ असून या संघाचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो आणि ही जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. आम्ही या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करून  टेबल टेनिसच्या विश्वात पुण्याचा दबदबा निर्माण करु, असे कर्णधार हरमन देसाईने म्हटले आहे.  
 

पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक

२५ जुलै २०१९ पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्ध दबंग दिल्ली टी.टी.सी.
२८ जुलै २०१९ पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्द चेन्नई लायन्स
३० जुलै २०१९ पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्ध आरपी-एसजी मावेरिक्स कोलकाता
३ ऑगस्ट २०१९ पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्ध यू मुम्बा टीटी 
७ ऑगस्ट २०१९ पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्ध  गोवा चॅलेंजर्स

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Puneri Paltan Table Tennis announces Harmeet Desai as the captain for Ultimate Table Tennis Season 3