पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाकिबसाठी काय पण! बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर

शाकिबसाठी क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने केलेल्या कारवाईनंतर त्याच्या चाहत्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. शाकिबने खेळाडूंच्या संपाचे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्यासोबत बुकींनी  संपर्क साधल्याची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आयसीसीने त्याला दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. 

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी

आयसीसीने केलेल्या कारवाईनंतर शाकिबने सार्वजनिकरित्या पाठिंबा मागितला होता. त्याला प्रतिसाद देण्यासाठी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसीसीच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकिबचे निवासस्थान असलेल्या मगुरा येथे जवळपास ७०० लोकांनी रस्त्यावर उतरुन आयसीसीच्या कारवाईविरोधात निषेध नोंदवत. कारवाई मागे घेण्याची घोषणाबाजी केली. मानव साखळी करत शाकिबच्या  चाहत्यांनी आयसीसीच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली. शाकिब विरोधात कट रचण्यात आला आहे. त्याला या प्रकरणात अडकवल्याची भावना देखील आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.  

वॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास!

उल्लेखनिय आहे की, शाकिबने आयसीसीसमोर आपली चूक मान्य केली आहे. क्रिकेटवर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईमुळे खूप दुःखी असल्याचे शाकिबने म्हटले होते. आयसीसीच्या कारवाईमुळे आगामी आयपीएलसह शाकिब टी-२० विश्वचषकालाही मुकणार आहे.