प्रदीप नारवालच्या कडक आणि विक्रमी कामगिरीच्या जोरावर तीनवेळच्या चॅम्पियन पटना पायरेट्सने रविवारी पुणेरी पलटणला ५५-३३ अशा फरकाने पराभूत केले. या सामन्यात नारवालने पुन्हा एकदा सुपर १० ची किमया केली. या सामन्यात त्याने तब्बल १८ गुणांची लयलूट केली. पाटणा पायरेट्सचा हा सलग तिसरा विजय ठरला.
Pro Kabaddi 7 : केदार जाधवच्या हस्ते पुणेरी पलटणच्या घरच्या हंगामाची सुरुवात
याशिवाय पाटणा पायरट्सच्या नीरज कुमारने देखील मनजीत छिल्लरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने ११ टॅकल गुण मिळवले. या जोडगोळीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरट्सने प्रो कबड्डीच्या यंदाच्या हंगामात एका सामन्यात सर्वाधिक पॉइंटस नोंदवण्याचा पराक्रमही करुन दाखवला.
पुणेरी पलटण पुढील सामना १८ सप्टेंबर रोजी तामिळ थलायवाज विरुद्ध तर पाटणा पायरेट्स आणि तेलगु टायटन्स यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी रंगलेल्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात फॉर्च्यून जाइंट्सला ३४-३० अशी मात दिली.
Pro Kabaddi 7: पुणेरी फलटणच्या घरच्या मैदानातील माहोल
प्रदीप नारवालची कामगिरी :
नारवालने पाचव्या हंगामात १९ सुपर १०, सहाव्या हंगामात १५ सुपर १० तर यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यात सुपर १० चा पराक्रम केला आहे.
एका सामन्यातील सर्वाधिक टेकलचा विक्रम
नीरज कुमारने ११ टेकल पॉइंटसह मंजित छिल्लरच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका सामन्यात सर्वाधिक टेकल पॉइंटचा हा विक्रम आहे.
गुणतालिकेतील टॉपर संघ
यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सामन्यात दबंग दिल्ली १५ पैकी १२ सामन्यातील विजयासह ६४ गुणांसह आघाडीवर आहे. त्यानंतर बंगाल वॉरियर्स १६ पैकी ९ सामन्यासह ५८ गुणांसह दुसऱ्या तर हरयाणा स्टिलर्स (५४) आणि बंगळुरु बुल्स हे संघ (४९) गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.