पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रो-कबड्डीची दंगल! चार संघ फायनल गाठण्यासाठी घेणार 'पंगा'

प्रो कबड्डीचा सातवा हंगाम अंतिम टप्प्यात

प्रो कबड्डीचा सातवा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. बुधवारी ट्रान्सस्टेडिया स्थित इका एरेनाच्या स्टेडीयमवर गतविजेता चॅम्पियन बंगळुरु बुल्स आणि दबंग दिल्ली यांच्यात पहिला उपांत्य सामना रंगणार आहेय तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि यु मुम्बा एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

फेडररचं ऑलिम्पिंकमध्ये खेळण्याबाबत ठरलं!

दबंग दिल्ली पहिल्यांदाच प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर दुसरीकडे बंगळुरु बुल्स आपला दबदबाद कायम ठेवण्यास प्रयत्नशील असेल. खेळातील सातत्य दाखवून सलग दुसऱ्यांदा फायनल मारण्याच्या दिशेने बंगळुरु बुल्स प्रवास कायम ठेवणार की दबंद दिल्ली हंगामाचा नूर बदलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय

दुसऱ्या सामन्यातील यू मुम्बा आणि बंगाल वॉरियर्स यांचा विचार केल्यास ऐकमेकांविरुद्ध खेळताना यू मुम्बाचे पारडे जड राहिले आहे. दोन्ही संघातील १३ सामन्या यू मुम्बाने १० तर बंगाल वॉरियर्सला केवळ ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे. पुणेर फलटनचा प्रवास संपुष्टात आल्यानंतर यू मुम्बाही महाराष्ट्राची एकमेव टीम उपांत्य सामन्यापर्यंत पोहचली असून हा सामना जिंकून यू मुम्बाने फायनल गाठावी हिच महाराष्ट्रातील तमाम कबड्डी चाहत्यांची इच्छा असेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pro Kabaddi League 2019 Semi final Dabang Delhi vs Bengaluru and Bengal Warriors vs U Mumba