पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हीच ती वेळ! डोपिंगमध्ये दोषी ठरलेल्या पृथ्वीच्या धमाकेदार 'कमबॅक'ची

पृथ्वी शॉ

Syed Mushtaq Ali Trophy: उत्तेजक द्रव्य घेतल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटच्या मैदानातून झोकात पुनरागमन केले. रविवारी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या पृथ्वीने आसामविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला नुकतेच मुंबई संघाच्या १५ सदस्यीय संघात सहभागी करण्यात आले होते.  

ICC Ranking: शमी- मयांकची टेस्ट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी

पृथ्वी शॉने या सामन्यात ३९ चेंडूत ६९ धावा केल्या. पृथ्वीने  आदित्य तारेच्या साथीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८२ चेंडूत १३८ धावांची भागीदारी केली.  तारेने ४८ चेंडूत ८२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात मुंबईने ५ बाद २०६ धावा केल्या होत्या.  या धावांचा पाठलाग करताना आसामचा संघ ८ गड्याच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात अवघ्या १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय

उल्लेखनिय आहे की, २० वर्षीय पृथ्वी डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर ३० जुलैपासून त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याने पहिला सामना खेळला. पृथ्वीने आपल्या अर्धशतकी खेलीत १२ चौकार आणि २ षटकार खेचले. सामन्यापूर्वी पृथ्वीने नेटमध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. सामन्यातील खेळीने त्याने पुन्हा मैदानात लक्षवेधी कामगिरी करण्यात सज्ज असल्याचे संकेत दिले.